समाजाच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रेरणा देणारी लोकमत महा मॅराथॉन 2024 यंदा जेप्राईम बिल्डकॉनच्या सहकार्याने अधिक सशक्त आणि प्रेरणादायी बनली आहे. नवी मुंबईतील हजारो धावपटूंना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाचा अभिमानाने भाग होऊन जेप्राईम बिल्डकॉनने आरोग्य व फिटनेससाठी आपली वचनबद्धता दाखवली आहे.
आमचे एमडी श्री. अविनाश जगदाळे यांनी सांगितले, “मॅराथॉन ही फक्त एक स्पर्धा नसून, ती समाजाला आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी प्रेरित करण्याचा एक महत्त्वाचा संदेश आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही या चळवळीचा भाग आहोत.”
धावपटूंना प्रोत्साहित करताना आणि आरोग्याचा संदेश पसरवताना, आम्ही समाजहिताच्या उपक्रमांसाठी नेहमीच पुढे येऊ. जेप्राईम बिल्डकॉनसाठी, आरोग्यदायी आणि सशक्त समाज घडवणे हीच खरी उंची आहे.